अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणारे आजार, व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाला सोसावा लागणारा आर्थिक आणि मानसिक बोजा, अमली पदार्थ मिळवण्यासाठी पत्करले जाणारे धोके आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम, असे या सामाजिक प्रश्नाचे विविध पैलू आहेत. मुळात अमली पदार्थ येतात कुठून, त्याचा पुरवठा कोण करतं, यामागचे राजकारण आणि अर्थकारण काय, यावर उपाय काय, अशा सर्व बाजूंनी हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न विचारात घ्यावा लागतो. आज आपण गांजा पासून आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेणार आहोत.
गांजाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो खास करून मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, जननसंस्था, रक्त, श्वसनसंस्था वगैरे
१. गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे, अगदी बेशुध्दीपर्यंत अवस्था येऊ शकते. निरनिराळे भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमितपणे घेण्याकडे कल होतो. यामुळेच व्यसन वाढते
२. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथर, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात. स्पर्म कांऊट कमी होतो त्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
३. गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसनाचे आजार होतात.व अचानक श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो.
४.गांजाच्या वापराने रक्तदाब वाढतो आणि रक्तदाब वाढल्याने हृदयविकार होउ शकतो.
५. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास फुफुसाचा कर्करोग, रक्ताचा कर्क रोग, मेंदूचा कर्क रोग होऊ शकतो.