मोबाईल व लॅपटॉप वापरताना कोणती काळजी घ्यावी वाचा डॉ. भरत चौगुले यांच्या टिप्स


 आजकाल मोबाईल फोन व लॅपटॉप चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि हा वापर अनिवार्य  झाला आहे. त्यामुळे वापरणे टाळणे शक्य नसल्याने वापरताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.
१ चार्जिंग सुरु असताना मोबाईल वर बोलणे किंवा लॅपटॉप वर काम करणे टाळा. चार्जिंग सुरु असताना रेडिएशन चे प्रमाण दुपटीने वाढते त्यामुळे शॉक लागणे किंवा स्फोट होणे अशा घटना घडतात.
२. शरीरापासून मोबाईल व लॅपटॉप कमीतकमी एक  दीड फूट लांब ठेवावा,
      मोबाईल व लॅपटॉप मधून निघणारे रेडिएशन हे शरीरासाठी घटक आहेत. त्यामुळे त्याचा थेट संपर्क शरीराला होऊ देऊ नये. मोबाईल वरच्या खिशात ठेऊ नये त्यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढते. व पुरुषांनी लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करू नये त्यामुळे शुक्राणूचा काउन्ट कमी होतो. त्यामुळे  गर्भ धारणेस अडथळे येतात.
३. झोपताना उशीखाली मोबाईल ठेऊ नका हानिकारक रेडिएशन चा मेंदूवर परिणाम होऊन भविष्यात तुम्हाला मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो.
४. रात्री अंथरुणात पांघरून घेऊन मोबाईल हाताळणे बंद करा.
        अंधारात मोबाईल मधून निघणारा कडक प्रकाश जास्त वेळ डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे  मोबाईल लॅपटॉप चा उपयोग पुरेशा उजेडात करा.
५. गरोदर असताना.
     गरोदर असताना जास्त वेळ मोबाईल वर बोलणे टाळा. लॅपटॉप वापरात असाल तर शरीरापासून विशेषतः पोटापासून लांब ठेवा