गौतम बुद्धाविषयी एक गोष्ट.
एक माणूस बुद्धाच्या अंगावर थुंकला.बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने ती थुंकी पुसली आणि मनातल्या मनातही क्रोधीत न होता, अगदी सहजपणे विचारले," आणखी काही सांगायचे आहे?" तो मनुष्य बावरला , काय उत्तर द्यावे ते त्याला सुचेना. तो बुद्धाला म्हणाला "हे तुम्ही काय विचारता?" बुद्ध म्हणाला "मी बरोबर विचारले, तुम्हाला आणखी काही सांगायचे आहे का?" तो मनुष्य म्हणाला "मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते. केवळ थुंकलो.." बुद्ध म्हणाला "तुम्ही थुंकलात, पण मला वाटले तुम्ही मला काही विचारलेत, कारण थुंकणे हि पण सांगण्याची एक रीत आहे.कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला असेल कि जो तुम्ही शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा असेल, म्हणून तुम्ही शब्दही न बोलता थुंकण्याद्वारे प्रदर्शित केलात. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो , पण जेव्हा ते शब्दांनी प्रकट करता येत नाही, तेव्हा ते काही इशारेद्वारा सूचित करतो.तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दांनी प्रदर्शित करू शकला नाही, तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखवलात, आणि तुमच्या मनातली गोष्ट मी समजलो."तो माणूस म्हणाला" तुम्ही मला समजला नाही. मला तुमचा फार राग आला होता.तो मी दाखवला." बुद्ध म्हणाला "मी बरोबर समजलो. तुम्हाला माझा राग आला होता तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रगट केलात." तो माणूस म्हणाला " मग तुम्ही माझ्यावर का क्रोधीत झाला नाही? बुद्ध म्हणाला" तुम्ही काही माझे मालक नाही.तुम्हाला माझा राग आला, तो दाखवण्यासाठी आणि मला भडकवण्यासाठी तुम्ही माझ्यावर थुंकलात, म्हणून तुमच्या इच्छे प्रमाणे मी जर भडकलो तर मी तुमचा गुलाम ठरेन.मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा , तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाही. तुम्हाला क्रोध आला, तो तुम्ही दाखवलात, आता मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे.मला जे करायचे ते मी करेन." दुसऱ्या दिवशी तो माणूस रडत बुद्धाची क्षमा मागायला आला. बुद्ध म्हणाला - आता आणखी काही सांगायचे आहे का? तो माणूस म्हणाला - आपण हे काय विचारता? बुद्ध म्हणाला मला सगळे काही समजले. तुमच्या मनातला पश्चाताप भाव इतका तीव्र झाला आहे कि तो तुम्ही केवळ शब्दांनी प्रगट करू शकत नाही, म्हणून डोळ्यात पाणी आणून आपले मस्तक माझे पायावर ठेवून,इशाऱ्याने तुम्ही तो व्यक्त करीत आहात. कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होतात, पण ते व्यक्त करणे शब्दांच्या पलीकडले असल्याने , तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेलात. आजही तुम्ही मला जे सांगू इच्छित आहात तेही शब्दांच्या पलीकडले असल्याने आपल्या डोळ्यातील अश्रुद्वारा , आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून खुणांनी तुम्ही व्यक्त करीत आहात. ते सगळे मी बरोबर समजलो." तो माणूस म्हणाला " मी क्षमा मागायला आलो आहे. मला क्षमा करा." बुद्ध म्हणाला - मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमध्यावर क्रोध केलाच नव्हता तर क्षमा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? काल जसे तुम्ही माझ्यावर थुंकलात त्याच प्रमाणे आज माझ्या पाया पडलात . बस, तुम्ही स्वतःच आपल्या स्वतःच्या कृत्याची फिट्ट - फाट केलीत.त्यात मला काही कर्म करायची काय जरूर? मी काही तुमचा गुलाम नाही, कि तुम्ही रागावलात, तर मीही रागवावे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला क्षमा करायची."
प्रतीकर्म म्हणजे गुलामी. जी, दुसरे तुमच्या कडून करवून घेतात.जे गुलाम नाहीत, परंतु स्वतंत्र आहेत ते कर्म करतात.प्रतीकर्म करीत नाहीत.
Copied from Rahul kamble f b wall