कुठे जातं हो हे ?
----------------
रस्त्यांवर काढलेल्या रांगोळ्या, उधळलेला गुलाल, फटाक्यांच्या कागदांच्या कोश्यांना चिकटलेली रासायनिक दारू या मिरवणुकांच्या शेवटी ज्या रस्त्यांवर विखुरलेल्या राहतात मग त्या निवडणुकीत निवडून आल्यानंतरच्या असतील अथवा विसर्जन मिरवणुकी नंतरच्या असतील त्या जातात कुठे हो?
कुत्रे फिरायला नेतो त्यांचे मल-मुत्र (पश्च्यात्य देशांमध्ये प्रत्येक बागेत कुत्र्याची घाण टाकण्यासाठी जागोजागी डब्बे ठेवलेले असतात. कुत्र्याने घाण केली की फिरवणारा मालक लगेच ग्लोव्ह घातलेल्या हाताने उचलतो, ग्लोव्ह उलटा करून काढतो व घाणीसह त्या डब्यात टाकतो), धुतलेल्या गाड्यांचे ऑईल मिश्रित पाणी,वेळोवेळी गाड्यांची PUC न केल्याने अर्धवट जळलेल्या इंधनाचा काळा धूर व भेसळयुक्त इंधन गाड्यांमध्ये वापरल्याने जळालेल्या केरोसीन चा काळा धूर यामुळे झाडांच्या फांद्या-पानांवर, रस्त्यांवर, घरांच्या छपरांवरील काजळी पावसाच्या पाण्यात मिसळल्या नंतर वाहणारं आम्लयुक्त पाणी, साठवलेल्या कॉलनीच्या कोपऱ्यावरल्या काचराकुंडीतून रंग-गंधयुक्त पावसाळ्यात वाहणारं पाणी व गाडी थांबवून कुणी पहात नाही याची काळजी घेऊन प्लास्टिकच्या पिशवीतून नदीत फेकलेले निर्माल्य, जाते कुठे हो?
मोकाट गुरं-ढोरं,भटकी कुत्री-मांजरं(बाधित कुत्र्याच्या मुत्रातून लेप्टोस्पायरोसीस हा आजार होतो. अनवाणी पाय अथवा चप्पल घातलेले पाय, पावसाळ्यात पाण्यातून चालताना जर पायाला कुठे छोटासा कट किंवा छोटीसी जखम झालेली असेल तर हे जंतू शरीरात जातात, सुरुवातीच्या पावसाच्या पाण्यात कुत्री असलेल्या घरा शेजारच्या तुंबलेल्या पाण्यातून चालल्याने या रोगाची बाधा होऊन माणसे दगावल्याची उदाहरणे आहेत) हे कमी म्हणून की काय तर कोंबड्या-शेळ्या-डुकरं या सगळ्याचं मल-मुत्र, पान तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या लोकांची केमिकल मिश्रित थुंकी, शहर प्रशासनाने फवारलेली विविध प्रकारची रसायने(पेस्टीसायीड, इन्सेक्टीसायीड, एक्टो-प्यारासिटीसाईड) पावसाच्या पाण्यात मिसळल्या नंतर जातात कुठे हो?
रस्त्याच्या कडेला केलेली केलेली लघवी, उघड्यावरच केलेले सौच त्यातले जंतू पाण्यात मिसळून कुठे जातात हो?
सहज आपला प्रश्न !
पावसाच्या पाण्यासोबत नद्या नाल्यांमधून भाज्या,अन्नामध्ये व दुधातून माणसाच्या आहारात व त्या नंतर नद्यांना आपण तलावात सोडतो, पाण्याची साठवण, पिण्यासाठी तसेच शेतीसाठी उदा. गोदावरी नदी जायकवाडी धरणात, नाशिकची घाण मराठवाड्याला, पुढे तशीच आंध्रातून बंगालच्या उपसागरात, माश्यांच्या पोटातून माणसाच्या शरीरात.
अमेरिकेत सियाटल नावाचे शहर आहे, बिल गेट्स च्या मायक्रोसोफ्टची राजधानी. फेरफटका मारत असतांना एके ठिकाणी बोर्ड दिसला त्यावर लिहिलं होत की, गाड्या धुतल्यानंतर किंवा पाऊस गाड्यांवर पडल्यानंतर जे पाणी जमिनीवरून वाहत जाते ते नदीत जाण्या अगोदर प्रक्रियेतून काढणं गरजेचं आहे म्हणून ते उताराला जिथे एकत्र होत तिथे प्रक्रिया करून स्वच्छ करूनच नदीकडे सोडण्याचा एक प्लांट उभारला होता.
आपला देश गरीब आहे. नाकबूल करीत नाही. परंतु थोडी शिस्त व नागरी भान बाळगले तर बऱ्याचश्या गोष्टी आपण टाळू शकू असे नाही का वाटत?
*डॉ संजय अपरांती,*
निवृत्त पोलीस उपायुक्त.
एम.बी.बी.एस, एम.डी., एम.ए. (समाजशास्त्र),एम.एस.सी. (गुन्हेगारी शास्त्र),एल.एल.बी.
डॉ.संजय अपरांती यांनी पाठवलेला वरील मेसेज सर्व व्हॉट्सप युजर्सनी महिन्यातून किमान दोन वेळा आपल्या सर्व व्हॉट्सप कॉन्टॅक्टवर पाठवावा. वारंवार येणारा मेसेज वाचून मोठी जनजागृती होऊ शकते. सर्वच गोष्टी सरकारनी किंवा स्थानीय स्वराज्य संस्थांनी करण्याची अपेक्षा करणे चूक आहे.
चला......
आपणही थोड मनावर घेऊया......