छञपती शिवाजी महाराज शाळेत गेले नव्हते.?

सध्या वॉट्स अँप वर एक मँसेज फिरतोय तो असा की *शिवाजी माहाराज शाळेत गेले नव्हते* त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. सवईप्रमाणे आपलीच माणसे हा मँसेज काही शहानीषा न करता तसच पुढे पाठवात आहेत. वरील माहीती हि साफ चुकीची आहे. शिवाजी माहाराजांच्या शिक्षणासाठी शहाजी राजांनी वेगवेगळे गुरूजी म्हणजे शिक्षक नेमले होते असे परमानंद त्यांच्या शिवभारत ग्रंथात लिहतो.
" मग तो मुलगा सात वर्षाचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला आहे असे राजास(शहाजीराजे) वाटले प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुध्दीमान आणि स्पष्टोच्चार करणा-या त्या पुत्राला(शिवरायांना) गुरूच्या मांडीवर बसविले. गुरूजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात, तोंच हा दुसरे अक्षर सुध्दा लिहून दाखवीत असे सकल विद्यांचे द्वारच अशी जी मूळाक्षरे ती सर्व गुरूजीने त्याला उत्तम रीतीने शिकवली."
संदर्भ : शिवभारत अध्याय : ९/७०/७१/७२
यापुढे कविंद्र परमानंद यांनी महाराजांना कोणकोणत्या विद्या येत होत्या या बद्दल ही लिहले आहे.
"श्रुती, स्मृती, पुराणे, भारत, राजनिती, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, तसेच तामुद्रीक, निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषीत, हत्ती, घोडे व रथ यांवरून बसणे तसेंच त्यांची लक्षणे, चढणे व उतरणे दौड मारणे, उडी मारणे, तरवार, धनुष्य व चक्र, भाला, पट्टा व शक्ती, युध्द व बाहुयुध्द, दुर्ग अभेद्य (दुर्गम) करणे, दुलक्ष निशाण वेधणे, दुर्गम संस्थानांतून निसटून जाणे, इंगित जाणणे, जादुगीरी, विष उतरणें, नाना प्रकारची रत्न परिक्षा, अवधाने, ह्या सर्व विद्या शास्त्रे व कला यांमधे स्वत: प्रवीण होऊन गुरूस सर्व गुरूस मोठे यश दिले"
संदर्भ : शिवभारत : अध्याय १० वा श्लोक ३४-४०
अश्या ह्या आपल्या यशवंत, कीर्तिवंत, सामर्थवंत वरदवंत शिवरायांच्या गुणांचे वर्णन करताना त्यांच्या दरबारात असलेला कवी भूषण म्हणतो की सौंदर्य, गुरूत्व, प्रभूत्व या गुणांमुळे त्यांना आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूता आणि विनम्रता हे गुणही शिवरायांत आहेत. शंत्रूंना ते तलवारीचे दान तर दिनांना ते अभयदान देतात. शाहाशी प्राणपणाने युध्द आणि विवेक हे असे सर्व गुण शिवसरजात एकवटले आहेत.
संदर्भ : शिवभारत
संपादक : सदाशिव म. दिवेकर
शिवभूषण
संपादक : निनादराव बेडेकर.