आज संध्याकाळी ऑफिस मधून घरी निघण्यासाठी नेहमीप्रमाने uber बुक केली.थोड्या वेळाने cab आली पण गाड़ी पाहिल्या बरोबर धक्काच बसला. KL 63 अस
केरळच passing असलेल्या गाडीवर चक्क 'छत्रपती' लिहिलेलं आणि nameplate वर होत महाराजांच सुंदर चित्र.
कोची मधे येऊन एक -दीड वर्ष झालं पण कधीही आपल्या राजाविषयी काहीही पाहिल किंवा ऐकल नव्हतं. Communist परंपरा आणि डावी विचारसरणी खुप खोलवर रुजलेल्या केरळ मधे येता जाता फक्त 'कॉमरेड' बद्दल ऐकायल मिळत. म्हणुन शिवाजी महाराजांचा असा कुणीतरी fan इथे मिळेल याच अप्रूप वाटण साहजिकच होत. असो.
तर गाडीत बसल्यावर पहिल driver ला विचारल
'where r u from?'
त्याने उत्तर दिलं'
'kochi'
मी थोड़ confuse होऊन पुढे विचारलं,
'You have Shivaji Maharaj Portrait on your car outside. Do you know him?'
' Yes'
तो.
मी,
'So you must have learn some history lesson about him while studying in Primary School!'
म्हटलं जस आम्ही शाळेत शिकत आलोय तसाच हा सुद्धा शिकला असेल.(भाबड़ी आशा)
त्यावर तो म्हटला,
'No.'
' Then?'
मी
तो सांगू लागला,
' I am Bachelor in History. I studied about his work during Graduation.After then I became a big fan of him. I read many books based on his life.'
त्याच बोलन सुरु असताना माझ लक्ष गाड़ी मधे समोर ठेवलेल्या Jesus च्या मूर्तिकडे गेलं.
त्याच्या ते लक्षात आल आणि तो हसून बोलला
'I am cristian but still I adour Shivaji Maharaj.Shouldnt I ?'
मी स्तब्ध झालो.याला काय उत्तर देउ?
आम्ही मराठी बोलतो, प्रत्येक शहरात महाराज्यांचे स्मारक उभारतो आणि दोन-दोन जयन्त्या सुद्धा साजरया करतो.
आमचे राज्यकर्ते सोइनुसार महाराजांचा वापर सर्रास करतात.पाहिजे त्या योजना महाराज्यांचे नाव वापरून सुरु करतात.अगदी राजे फक्त हिंदुत्व वादी होते हे सुद्धा आम्हाला त्यांनी पटवून दिलाय!
महाराजांच्या माती मधल्या सगळ्यांना किती गर्व त्यांचा!
कुठेही महाराजांबद्दल काही ऐकू आल तर आम्ही पहिले हल्ला करतो बोलणारया वर(बर्याचदा पुरेशी माहिती नसताना सुद्धा).महाराज मराठी होते म्हणून त्यांचे सगळे copyrights आमच्याकडे आहेत असाच काहीसा आपला समज!
भगवा टिका माथि लावला आणि छत्रपति शिवाजी महाराज की जय एवढे बोलल म्हणजे आम्ही खरे शिवभक्त.आजकल तर काय घरा घरा वर भगवा झेंडा लावून आम्ही आमची शिवभक्ति अजुन दृढ़ (?)करत चाललोय.
पण एवढं सगळ असून सुद्धा त्या एका प्रश्नाने मी एवढा tense का झालो?
कुठे शालेय शिक्षणात शिव चरित्राचे धड़े शिकलेलो आम्ही आणि कुठे collge मधे एक subject म्हणुन 'शिवाजी महाराज कोण होते?' शिकलेला हा अमराठी, महाराष्ट्रपासुन कोसो दूर राहनारा मुलगा.त्याच्या एका प्रश्नाने एवढे प्रश्न उभे केले!
त्याच्या प्रश्नाच उत्तर मी अजुन शोधातोय.
खरचं आम्हाला महाराज समजले का?