मंडळी प्रवासात तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभे असणारे मैलाचे दगड नेहमीच दिसत असतील. मार्गावरचं गाव, शहरे आणि ठिकाणांचं अचूक अंतर सांगणारे हे दगड आपल्याला फारच मदतगार ठरतात. आता आपण अंतरं किलोमीटरमध्ये मोजत असलो तरी या दगडांना मैलाचे दगडच म्हटलं जातं. रस्ता जसा बदलेल तसे हे दगडही वेगवेगळ्या रंगाचे दिसायला लागतात. एखाद्या रस्त्यावर ते काळ्या रंगाचे असतील, तर एखाद्या रस्त्यावर काळ्या किंवा पिवळ्या रंगाचेही दिसतील. या दगडांच्या वेगवेगळ्या रंगांमागेही वेगळा अर्थ दडलेला असतो मंडळी. या आपण जाणून घेऊया...
पिवळा रंग
जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड दिसत असतील तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गवरून प्रवास करताय असं समजा. हे रस्ते एका प्रदेशाला दूसऱ्या प्रदेशाशी जोडतात. आणि या महामार्गांची निर्मीती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाते.

हिरवा रंग
रस्त्याच्या कडेला जर हिरव्या रंगाने रंगवलेले मैलाचे दगड असतील तर तो रस्ता राज्य महामार्ग आहे असं समजा. हे महामार्ग दोन मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करतात. आणि या स्टेट हायवेची निर्मिती राज्य सरकारच्या PWD म्हणजेच पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडून केली जाते.

नारंगी रंग
ज्या रस्त्यांच्या कडेला नारंगी रंगाने रंगवलेले मैलाचे दगड असतील ते रस्ते नॅशनल किंवा स्टेट हायवेला गावांशी जोडण्याचे काम करतात. आणि या रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत बनवलं जातं.

काळा कीवा निळा रंग
काळ्या किंवा निळ्या रंगाने रंगवलेले मैलाचे दगड हे शहर किंवा गावाच्या सीमेजवळ असतात. रस्त्यावरील या दगडांना पाहून तुम्ही समजू शकता की एखादं शहर जवळ येत आहे. यांची निर्मिती त्या स्थानिक PWD विभाकडून केलेली असते.