*भूतकाळात डोकावल्या शिवाय*
*मजा काही मिळत नाही*
*मागे वळून पाहिल्यावर*
*हसावं का रडावं कळत नाही*
*साऱ्याच गोष्टी मध्ये*
*खूप खूप बदल झाले*
*पहिल्या पेक्षा प्रत्येकाला*
*नक्कीच बरे दिवस आले*
*खरं वाटणार नाही पण*
*एवढं सगळं बदललं*
*निगरगट्ट माणूस सुद्धा*
*मुळा सकट हादरलं*
*शाळेतून घरी गेल्या गेल्या*
*दप्तर कोनाड्यात जायचं*
*दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना*
*बाहेर काढल जायचं*
*अहो दप्तर म्हणजे काय*
*वायरची पिशवी असायची*
*जुन्या फाटक्या पुस्तका सोबत*
*फुटकी पाटी दिसायची*
*अभ्यास कर म्हणून कुणी*
*म्हणलंही नाही*
*अन मार्क कमी पडले म्हणून*
*हाणलंही नाही*
*कोणताही ऋतू असो*
*काळपट चहा असायचा*👌
*तडकलेल्या बशीवर*
*कानतुटका कप दिसायचा*
*बारा महिने अनवाणी पाय*
*चप्पल म्हणजे श्रीमंती*
*पायाला चटके बसायचे*
*पण सगळ्या गावात हिंडायचे*
*कुणाचं गुऱ्हाळ लागलं की*
*चला रस प्यायला*
*खळे दळे लागले की*
*चालले शेतात झोपायला*
*मरणाची गरिबी होती*
*पण मजा मात्र खूप*
*लग्ना कार्यात माणसं , नाती*
*व्हायची एकरूप*
*अमावस्येच्या दिवशी पोरं*
*मारुतीच्या पारावर*
*नारळाच्या टूकड्यासाठी*
*एकमेकाच्या अंगावर*
*ओ मामा द्या नं , ओ मामा द्या नं*
*एकच गलका व्हायचा*
*रेटा रेटी केल्यामुळं*
*सदरा टरकून जायचा*
*पाहुण्याला पाहुणचार म्हणून*
*खिचडी भजे व्हायचे*
*तेवढ्यातच सारयांचे*
*डोळे भरून यायचे*
*तेलच्या-गुळवणी आणि पापडांची*
*काय मामलात होती*
*तरीही त्या माणसां मधे*
*माणुसकी होती*
*रात्र रात्र गप्पा व्हायच्या*
*डोळ्यात यायचं पाणी*
*आडपडदा न ठेवता*
*दुःखाची व्हायची गाणी*
*कुठे गेला तो साधेपणा*
*कुठे गेलं ते सुख ?*
*खरं सांगा पहिल्या सारखी*
*लागते का आता भूक ?*
*इतकुसाक पेढ्याचा तुकडा*
*मिडकू मिडकू खायचा*
*कधी तरी कुणी तरी*
*प्रसाद म्हणून द्यायचा*
*सारं सारं संपून गेलं*
*आता पैसा बोलत असतो*
*माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा*
*खोटं खोटं डोलत असतो*
*पेढ्याच्या बाॅक्स कडे*
*ढुंकूनही कुणी पहात नाही*
*एवढंच काय पहिल्या सारख्या*
*मुंग्याही लागत नाही*
*सुखाचं बोट कधी सुटलं*
*आपल्या लक्षात आलं नाही*
*श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं*
*तसं काही झालं नाहीे*
*ते सुख आणि वैभव*
*पुन्हा घरात येईल का ?*
*चिरेबंदी वाड्या मधून*
*हसण्याचा आवाज येईल का?