खंबीर तो हंबीर


खंबीर तो हंबीर
======================

मुंबई- बेंगलोर हायवेने जातांना कराड जवळ शिवरायांच्या स्वराज्याचे सरनौबत श्री. हंबीरराव मोहिते यांचं गाव आहे तळबीड... तेथे त्यांची समाधी सुद्धा आहे... हंबीरराव हे स्वराज्याचे सेनापती तर होतेच तसेच ते शिवरायांचे मेव्हणे म्हणजेच़ सोयराबाई यांचे बंधू सुद्धा होते....

... तळबीड  "स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं समाधी स्थळ"

.. तसं हायवे पासून दोन तीन किलोमीटरवरच़ गाव आहे... गावाजवळ जात असतांनाच़ वसंतगड नावाचा गड दृष्टीपथात येत असतो... त्याच्या पायथ्याशी वसलेल हे गाव आहे....गावात सुरुवातीलाच़ समाधी आहे.... रम्य परिसर आहे....

तिथे पोहोचून जेव्हा शिवरायांच्या आणि शंभुराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहून स्वराज्य रक्षण केलेल्या महान योध्याची समाधी बघितली तेव्हा अंगावर काटाच़ आला.....

आता पर्यत वाचलेला इतिहास झरकन डोळ्यासमोर आला....

हंबीररावांच़ महत्व फक्त स्वराज्याचे सरसेनापती किंवा महाराजांचे मेव्हणे इतकंच़ नव्हतं.... शिवराय गेल्यावर हे स्वराज्य जेव्हा कटकारस्थानांच्या भोवऱ्यात सापडलं होतं तेव्हा हंबीररावांच्या भूमिकेवर स्वराज्य टिकणार की बुडणार हे ठरणार होतं....

महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो सारख्या नतद्रष्टानी संभाजी महाराजांना विरोध म्हणून राजाराम महाराजांना गादीवर बसवून कारभार हातात घ्यायचा असा कट रचला आणि साम दाम दंड भेद करून मंडळातील 'काही' इमानदार लोकांना सुद्धा सहभागी करून घेतलं....

इतकंच़ नाही तर खुद्द सोयराबाईसुद्धा पुत्रप्रेमापोटी या कारस्थानाला बळी पडल्या... परंतु या महत्वाकांक्षेतला सगळ्यांत मोठा अडसर म्हणजे शंभुराजे यांना दूर कसं करणार ? ?

यासाठी खुद्द हंबीररावांना 'सख्खा नात्याच्या' पेचात अडकवून आपल्या बाजूने वळवायचे आणि त्यांच्या मदतीने शंभु राजांचा अडसर दूर करायचा असा मनसुबा रचला गेला....

त्याप्रमाणे ही अष्टप्रधान मंडळी त्यांच्याकडे तसं फर्मान घेऊन पोहोचली, परंतु हंबीरराव म्हणजे शिवरायांचे सच्चे शिलेदार... इतर सरदारांप्रमाणे स्वराज्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन स्वतःला वाहून घेतलेले.... त्यांनी हा कावा ओळखला आणि सख्या बहीणीच्या आणि भाच्याच्या पारड्यात आपलं वजन न टाकता सत्याची बाजु घेत शंभुराजांच्या मागे खंबीरपणे उभं रहायचा निर्णय घेतला....

त्यांच्या ठाम पाठिंब्याने शंभुराजांनी स्वराज्याचा कारभार हतात घेतला आणि हंबीररावांच्या समक्षच त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला....

हंबीरराव हे त्या नशीबवान लोकांपैकी एक आहेत ज्यांनी शिवराय आणि शंभुराजे या दोघांचेही राज्यभिषेक अनुभवले.....

आज फक्त कल्पना करून बघा की त्या crucial moment ला जर सख्खा आणि सावत्र या पेचात अडकून हंबीरराव सुद्धा कटात सामील झाले असते तर स्वराज्याच काय झालं असतं ? व आज आपली अवस्था काय झाली असती.नुसती गुलामी करत बसावे लागले असते.धन्य तो माझा राजा शिवछत्रपती 🚩. त्यामुळे शिवचरित्र किंवा शंभुचरित्रामध्ये हंबीररावांच़ स्थान हे खुप महत्वाचं आहे...

ताठ मानेने जगायचे असेल तर सध्या सुरू असलेली स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुद्धा सध्या याच़ वळणावर आहे.. सगळ्यांनी आवर्जून बघा आणि आपापल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा जरूर दाखवा.....

आणि आयुष्यात एकदा तरी हंबीररावांच्या समाधीस्थळाला भेट द्या... तुम्हाला नेहमी लढत राहण्याची, संघर्ष करण्याची ऊर्जा नक्की मिळेल....

स्वराज्याचे सरसेनापती श्री. हंबीरराव बाजी- मोहीतें ना मानाचा मुजरा......🚩🚩