स्वच्छता अभियान.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजीनी जसे ब्रिटिशाना QUIT INDIA असे सांगितले तसेच सर्व भारतवासियांना CLEAN INDIA चा पण मंत्र दिला होता. ते मंतरलेले दिवस होते. गांधीजी म्हणतील ते जनता मनापासून करीत होती . गांधीजी स्वत: हातात झाडू घेऊन आश्रम झाडीत होते. आणि त्यांच्याबरोबर मोठे नेते, गरीब, श्रीमंत, आणि लहानथोर, तसेच परदेशी स्वयंसेवक सुद्धा हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत होते.
तसेच मंतरलेले दिवस आता आले आहेत. सर्व भारतभर एकाच जयघोष चालू आहे तो म्हणजे “ एक कदम स्वच्छता की ओर” आणि “ क्लीन इंडिया ग्रीन इंडिया. विद्यालये , महाविद्यालये, NGO, मान्यवर व्यक्ती रेडीओ टीवी सर्वाना गांधीजींचे स्वप्न पुरे करावयाचे आहे. आणि त्यासाठी सर्व जण झटून कामाला लागले आहेत. असे अचानक घडते आहे का? नाही.

१९९१ पासून ह्या गोष्टी कडे सरकारचे लक्ष गेले होते. पर्यटनाच्या दृष्टीने भारत हा देश सर्व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. भारतासारखी विविधता , निसर्ग सौंदर्य ,पुरातन वस्तू ह्या सर्वांचे त्यांना आकर्षण आहे. पण अस्वच्छता आणि घाण कुणालाच आवडत नाही. त्यांच्या टीका ऐकून आपली मान शरमेने खाली जाते. पण सांगणार कोणाला?
ह्या साठी जन मानसात उजागर झाला पाहिजे. लोकांना स्वच्छतेचे महत्व जाणवून दिले पाहिजे हे ध्यानात आले. मग १९९९ मध्ये निर्मल भारत अभियान ह्याचा उदय झाला. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद आला नाही. मग २० सप्टेंबर २०१४ मध्ये स्वच्छ भारत ची मुहुर्तमेढ रचली गेली. आणि सुरु झाली एक भारत भर जागृती. संख्यात्मक विश्लेषण केले गेले, किती गावे शौचालाया विना आहेत त्याचा सर्वे केला गेला आणि एक धक्कादायक सत्य बाहेर आले.
वाचून तुम्हाला धक्का बसेल पण भारतात एकंदरीत ११०४ करोड परिवार शौचालाया विना आहेत, २.१५ लाख सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. ४४०१ गावांमध्ये शौचालय नाहीत.ह्यामध्ये स्त्रिया व मुलींची खूप कुचंबणा होते. मुलीना अर्ध्यावर शिक्षण सोडून घरी बसावे लागते. रात्री अंधार पडल्यावरच जाता येते. त्यामध्ये धोका पण असतो. मुंबईसारख्या महानगरात तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. पोटा पाण्यासाठी अख्ख्या भारतातून लोक मुंबईला येतात, झोपडी बांधून राहतात पण प्रातर्विधी साठी रेल्वे च्या बाजूला किंवा ट्रॅकवर बसतात. गाडीतून जाताना किती घाण वाटत असेल. का नाही परदेशी लोक आपल्याला स्लम डॉग म्हणणार ? लोक पान खातात, तंबाखू खातात आणि रस्त्यावर थुंकतात, भिंतीवर, जिन्यांवर, जुन्या गड किल्ल्यांच्या भीतीवर थुंकतात. रस्त्यावर घाण टाकतात. पण त्याचे त्यांना काहीच विशेष वाटत नाही. असे कसे?
कारण लहानपणापासून त्यांना अशीच सवय लागलेली आहे.बहुसंख्य लोक खेडोपाडी राहतात.आणि अजूनही जुन्याच सवयीने वागतात. एवढाच कशाला,आपणही काय बरोबर वागतो? बागेत, देवालयात, समुद्रकिनारी किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण प्लॅस्टिकच्या बाटल्या , प्लास्टिक पिशव्या, वेफर्स,कुरकुरे ची पाकिटे टाकतोच ना? गाडीतून जाताना रेल्वेतून, खिडकीतून,प्लास्टिक बाटल्या,खाण्याचे पदार्थाचे कागद, काहीही आपण निर्धास्तपणे टाकतो. हि घाण ट्रॅक वर साचते आणि मग पावसाचे पाणी तुंबते, उंदीर, माशा, डास ह्यांचा प्रादुर्भाव होतो. आणि त्यायोगे साथीचे रोग पसरतात. आपणच ह्या गोष्टींना निमंत्रण देतो.पण नाही! आता सरकार, नेते, मान्यवर , अगदी सामान्य माणसे देखील खडबडून जागे झाले आहेत एक कदम स्वच्छता की ओर म्हणत म्हणत पावलांवर पाऊल टाकीन आहेत.
ह्याचाच परिपाक म्हणून स्वच्छता अभियान नावाची मोहीम सुरु झालेली आहे. चला तर मग आपण ह्याचा आढावा घेऊ या.
सन २०१९ मध्ये महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे. तोपर्यंत भारत पूर्ण स्वच्छ करायचा आहे. हि एक सिस्टिमॅटिक योजना आहे ज्यामध्ये जनजागरण, सरकारकडून, TV , रेडिओ वर वर्तमान पत्रांद्वारे,स्पर्धांद्वारे, मोठ्या मोठ्या व्यक्तींकडून आवाहना द्वारे सर्वाना जागृत केले जाते. त्यासाठी सरकारने सर्व थरातील लोकांना राजदूत, नामांकन दिले आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर, प्रियांका चोप्रा, बाबा रामदेव ,अनिल अंबानी, सलमान खान, तारक मेहता टीम, कमल हसन, विराट कोहली, अनुष्का शर्मा, महेंद्रसिग धोनी अशी नावे आहेत.ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून गोपीचंद,हपमी कोनेड,व्हीव्हीएस लक्ष्मण इत्यादींची नावे आहेत. समिती ने कपिल शर्मा,सौरव गांगुली किरण बेदी, रामोजी राव ह्यांना नामांकित केले आहे. आणि ह्या सर्वांपेक्षा जनतेला अगदी आपले वाटणारे मुंबईचे डबेवाले पण ह्यात सहभागी झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यागी ह्यांनी पण तंबाखू व गुटखा ह्यांना पूर्ण बंदी घातली आहे. त्यांनी अखिलेश यादव, मनोज तिवारी, राजू श्रीवास्तव, सुरेश रैना, कैलास खेर,शिल्पा शेट्टी ह्यांना ब्रँड अम्बॅसॅडर केले आहे.अशा तऱ्हेने सर्वजण झटून मेहनत घेत आहेत जन जागरण करण्यासाठी. आपल्याला अमिताभ बच्चन आणि विद्या बालन ह्यंच्या मिश्किल जाहिराती बघून हसू आवरत नाही न ? पण लाज पण वाटायला हवी न? तरच ही सुधारणा होइल.
सरकारने ह्या कामासाठी ६२००९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एका कुटुम्बाला शौचालय बांधन्यासाठी सरकार १२००० रुपये मंजूर करीत आहे ज्यामध्ये ९००० रुपये केंद्र सरकार आणि ३००० रुपये राज्य सरकार देत आहेत. तसेच सरकार 2.१६लाख सार्वजनिक शौचालय बांधून देणार आहेत.
सर्वजण आपापला हातभार उचलित आहेत.आपण पण कांहीतरी करायला हवे न?
आपण काय करू शकतो?:-
आपण काय करू शकतो?:-
१] सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर बाटल्या, खाद्य पदार्थांची पाकिटे व इतर गोष्टी एका कागदात जमा करून कचरा कुंडीत टाकावा.जर कुंडी नसेल तर घरी घेऊन यावा व आपल्या कचरा कुंडीत टाकावा.
२] ओला आणि सुका कचरा असे निवडून तो कचरा नगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या गाडीत टाकावा.
३]कोणी रस्त्यावर थुंकत असेल, घाण टाकीत असेल तर त्याला अडवावे.
मग स्वत:पासून सुरुवात करूया, भारत स्वच्छ करूया
२] ओला आणि सुका कचरा असे निवडून तो कचरा नगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या गाडीत टाकावा.
३]कोणी रस्त्यावर थुंकत असेल, घाण टाकीत असेल तर त्याला अडवावे.
मग स्वत:पासून सुरुवात करूया, भारत स्वच्छ करूया