कारण ती ही असतात..... माणस


*कारण ती ही असतात..... माणस*

जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... *माणसं !*

नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
सारी असतात आपलीच *माणसं*