हरवलेला_इतिहास मातीचा किल्ला

#हरवलेला_इतिहास
मातीचा किल्ला?

गेली 5-6 वर्ष एक नवीन फॅशन आली आहे.. "तयार किल्ला विकत घेऊन त्यावर सैनिक मांडायचे".. खरतर किरकोळ गोष्ट वाटते पण यामुळे मुलांच्या मानसिक विकासात अडथळा निर्माण होतोय अस नाही का वाटत तुम्हाला???

गावभर फिरून दगडं गोळा करणे, शेतात जाऊन माती उकरून पोत्यात भरून ती सायकल वरून आणणे, सगळ्यांनी मिळून कोणता किल्ला करायचा याची चर्चा करणे, त्यानुसार सगळा प्लॅन आखणे, दगडांची रचना करणे, "छ. शिवाजी महाराजांची" जागा (सिंव्हासन) ठरवणे त्या जागे पर्यंत जाण्यासाठी पायऱ्या करणे,विहीर, जंगल व कोणता मावळा कुठे ठेवायचा हे ठरवणे..

एका मुघल सरदाराला फाशी द्याची, मुख्य दरवाजा, किल्ल्याभोवती खंदक,वडे,महाले इत्यादी गोष्टी.........
त्यात शेतात मोहरी पेरून त्याची होणारी हळूवार वाढ निसर्गची खुलणारी छटा व त्याची घेतली जाणारी काळजी
किती खोल विषय आहे हा ! नुसता खेळ नसून एक personality development चा कोर्स आहे....
पण या *ready made* किल्ल्यामुळे हे सगळे विषय बंद होत आहेत.. आणि आई वडील पण आवडीनं हे सगळं आणून देतात🙏

असंच जर झालं तर हळू हळू 'दगड, माती आणि मुलांच बालपण' नष्ट होतील,
आणि उध्या पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी पण असे फायबर चे किल्ले बांधले होते असे मुले विचारल्यास आश्चर्य नको!

हे थांबवायचे असेल तर आपणही या किल्ले बांधणीच्या प्रकियेत सहभागी होऊन आपल्या मुलांना छ. शिवाजी महाराज कोण होते हे अगदी योग्य पद्धतीने सांगू शकतो !
शिवाय मातीशी नातं टिकवणं हे हि तितकंच महत्वाचे नाही का ?