स्ट्रेस घालवण्यासाठी काही उपाय.


आपण एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवली पाहिजे कि आपली आपल्या कुटुंबासाठी फक्त पैसे कमावून आणणे इवढीच जबाबदारी नाही तर त्यांना तुमच्या सहवासाची हि तेवढीच गरज असते .घरामध्ये गेल्यावर सगळ्याशी आवर्जून बोलले पाहिजे .तुमच्या मुलीला जर काही शाळेतल्या काही गोष्टी सांगायचे असेल तर तुम्ही इंटरेस्ट घेऊन ऐकायला पाहिजे ,आई वडील तुमच्या दिवसभर वाट पाहत असतात ,तसे आपण काम बायको व आपली मुले यातून त्यांच्या वाट्याला खूप कमी येतो ,त्यांच्याबरोबर बसायला पाहिजे .तुम्ही त्यांच्याबरोबर राहता ,सांभाळता म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही .मला सांगा तुम्ही कधी आई/बाबा जवळ (किंवा आपल्या पत्नी )बसून गप्पा कधी मारल्यात ?त्यांचा हात हातात घेऊन बसा नजरेला नजर द्या खूप वेळ ,हा स्पर्श खूप काही सांगून जाईल ,त्यांचा तुमच्यावरचा विश्वास तुम्हाला एक नवीन बळ व संकटाला सामोरे जाण्याची शक्ती उभारी देईल.असो मला माहिती आहे कि आत्ता तुम्ही खूप इमोशनल झाला आहात,पण हि वस्तुस्थिती आहे व तुम्हाला कुणीतरी ह्याची जाणीव करून द्यायला हवी .रात्रीचे जेवण हे सर्वाना एकत्र घ्यावे ,आजकाल हॉटेल मध्ये गेल्यावरच असे होते पण जर ठरवले तर घरी सुद्धा शक्य आहे .रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वतःच्या प्रगतीसाठी काय करतो यावर एक छोटी नजर टाका ,मग भले ती शारीरिक संपत्ती असो वा शैक्षणिक विकासासंबंधी ,मला खात्री आहे कि हा विचार आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण करून देईल व हेच कारण आपल्याला सकाळी लवकर उठण्यास प्रवृत्त करेल व परत एक चांगला दिवस सुरु होईल.