महिलांसाठी खास Whatsapp गीत...



पाया पडते सुनबाई...
बंद कर तुझी चाल ।
पहील तुझ Whatsapp
चुली मधी जाळ ॥
रोज घालतीस तोकडी कापडं
नव काढतीस फोटू ।
रडूण रडूण उपाशिच
झोपून जातो छोटू ॥
डिपी का फीपी बदलण्याच्या नादात...
करपून जाते डाळ ।
पहील तुझ Whatsapp
चुली मधी जाळ ॥

सकाळी सकाळी ऊठून
देवा जवळ बसाव ।
शान्त चित्तान पाया पडून
काम करत हसाव ॥
अग भीक मागायचि लक्षण
नको बसू घाळ ।
पहीला तुझ्या Whatsapp चा
चूलीत कर जाळ ॥

लगिन झालय आपलं
शहाण्या सारख वागाव ।
चार दिसाच  सासू-सासरं
तोन्ड भरूण बोलाव ॥
आम्ही मरून गेल्यावर
बस वाजवीत टाळ ।
पहील तुझ Whatsapp
चुली मधी जाळ ॥

रोज एक मेनू बनवतेस
वाजवतेस झोपाय बारा ।
पुलाव असतो चांगला
पण त्यात दगड आणि गारा ॥
टून्ग टून्ग वाजतो फोन
पोरी लक्ष थोड  टाळ ।
पहील तुझ Whatsapp
चुली मधी जाळ ॥

डोळ्याला लागल चष्मा
अंगठा होईल बाद ।
खरच सांगते सुनबाई
हेव चांगला नाय नाद ॥
मान्य आहे मला
आधुनिक आहे हा काळ ।
तरी बी सांगते,
पहील तुझ Whatsapp
चुली मधी जाळ ॥

मान्य हाय दुनिया चंद्रावर गेली
पण मान मर्यादा पाळ ।
नायतर पोटातूनच
नेटपॅक माराय सांगल बाळ ॥

भान ठेवून लक्षात ठेव
घरात आहेत
सासू सासरे, नवरा आणि तुझं बाळ ।
पाया पडते सुनबाय...
Whatsapp चुली मधी जाळ...
चुली मधी जाळ ॥