तुम्ही वेळेला महत्त्व दया…वेळ तुम्हाला महत्त्व देईल

एक अप्रतिम संदेश
आपल्या आयुष्यात काही ठीक होत नाहिये, असं वाटतं आपल्याला …?
------>  थांबा…
-------> एक दीर्घ श्वास घ्या…
--------> आणि पुढे वाचा…
ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा चार तासांनी पुढे आहे…
पण याचा अर्थ भारत मागे आहे असा होत नाही…
कोणी २२व्या वर्षीच पदवी मिळवितो…
पण त्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागते…
कोणी २५व्या वर्षी CEO बनतं आणि ५०व्या वर्षी जग सोडून जातो …
तर कोणी ५०व्या वर्षी CEO बनून ९० वर्षे आनंदाने जगतो…
कोणी अजूनही अविवाहित आहे,
तर कोणी कुटुंबात रममाण झालेत…
ओबामा राजकारणातून ५०व्या वर्षी निवृत्त झालेत…
तर ट्रम्प यांची सुरुवातच ७०व्या वर्षी झाली…
या जगात प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जगत असतात…
कोणी आपल्या पुढे गेलंय असं आपल्याला वाटतं…
तर काहीजण आपल्या मागे राहिलेत असं जाणवतं…
खरं तर प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत धावत असतो…
:)आपल्या वेळेनुसार…
जे पुढे गेलेत त्यांचा द्वेष करू नका…
जे मागे राहिलेत त्यांची चेष्टा करू नका…
आयुष्यात आपली योग्य वेळ येईलच…
त्याची वाट पहा…
आणि
कष्ट करत रहा-प्रामाणिक बनत रहा…
वेळेला महत्त्व दया…वेळ तुम्हाला महत्त्व देईल
..(Be positive )