Positive thinking

वयाच्या 17 व्या वर्षी तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. 25 वर्षांची असताना आईचे आजारपणात निधन झाले.वयाच्या २६ व्या वर्षी ती इंग्रजी शिकवण्यासाठी पोर्तुगालला गेली. वयाच्या 27 व्या वर्षी लग्न झाल, तिचा पती तिच्याशी नेहमी गैरवर्तन करत असे, तरीही त्यांना मुलगी झाली!

वयाच्या २८ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला आणि तिला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. वयाच्या 29 व्या वर्षी ती फुटपाथवर लहान मुलीला सोबत घेऊन जगणारी एक लाचार आणि एकटी आई होती. वयाच्या 30 व्या वर्षी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..

पण... तिने तीचे ते काम करण्याचे ठरवले जे ती इतरा पेक्षा चांगले करू शकते आणि तिला लिखाणात ऋची असल्यामुळे तिने लिखाण करण्यास सुरुवात केली.

वयाच्या 31 व्या वर्षी शेवटी तिने तिचे पाहिले पुस्तक प्रकाशित केले. वयाच्या 35 व्या वर्षी तिने 4 पुस्तके प्रकाशित केली आणि तिला वर्षातील सर्वोतकृष्ट लेखिका म्हणून गौरविण्यात आले.

वयाच्या 42 व्या वर्षी, तिने तिचे नवीन पुस्तक लिहिले आणि प्रकाशित झाल्यावर पहिल्याच दिवशी १ कोटी १० लाख प्रती विकल्या गेल्या, ही तीच महिला आहे जिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्येचा विचार केला होता आणि तिचे नाव आहे जे. के. राऊलिंग.

आज हॅरी पॉटर हा $15 बिलियन पेक्षा जास्त किमतीचा जागतिक ब्रँड आहे.

सांगायचं तात्पर्य एवढच की आयुष्यात कधी ही हार मानू नका , स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करण्याची जिद्द असेल तर अशक्य अस काहीच नाही, भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण विजय हा निश्चित असतो!❤️