*स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा engineer जगात होणे नाही..*
*आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते.*
*कि जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो.आताही तो रायगड पाहायला भेटतो .*
*असे फक्त शिवकाळात होऊ शकते...आणि त्या शिलालेख प्रमाणे आज हि रायगड पाहायला भेटतो.*
*जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख:-*
*।। श्री गणपतयेनमः ।।*
*।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।।*
*।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।।*
*।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।।*
*।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।।*
*वापीकूपतडागराजिरू ।।*
*।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः* *कुंभिगृहैनरेंद्*
*रसदनै ।।*
*।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।।*
*।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समु*
*ज्जृंभते ।।*
*अर्थ :-*
*सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद*
*सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने*
*शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला.*
*या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा,*
*रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे,*
*ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो ll*
*☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम* ||
*|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀*