खरी_अंधश्रद्धा_कोणती

पोस्टकर्ता कोण माहीत नाही पण छान वैचारिक पोस्ट 

#खरी_अंधश्रद्धा_कोणती ?
फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायाना मानले
शिवरायांनी संत तुकारामाना मानले,
संत तुकाराम महाराज यानी
विठ्ठलपांडुरंगाला मानले,
पांडुरंग दगडाचा देव,
त्या मुर्तीला पूजतो मी,

समंजसपणे सांगतो मी, दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी. !

माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी, का?
--अन्नदान होते
--दवाखाना चालतो
--शिक्षण संस्था चालते
--परिसराचा विकास होतो
आणि हो--
-देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात हो -!
-- मुर्तीकार
-- फुलझाडे लावणारा शेतकरी
-- फुले विकणारा माळी
-- बेल आणणारा मजूर
-- बेल विकणारा गुरव
-- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार
-- हॉटेल चालक
-- स्टेशन वरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक
-- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर

हे सर्वजण काही भटजी नसतात हो
या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो हो !

म्हणून मायच्यान सांगतो,
या सर्वात देवत्व शोधणारा
माणूस आहे मी-!

दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी -!

दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी
"पूजा करा पूजा" म्हणत भटजीही फिरत नाही घरोघरी
अभिषेक करताना देतो ज्ञानाचीच शिदोरी-!
--कशी--?

-तो सूर्याला देवता मानतो,
-तो पाण्याला देवता मानतो,
-तो भूमिला देवता मानतो,
-तो अग्नीला देवता मानतो,
-तो वायूला देवता मानतो,

अभिषेक म्हणजे काय करतो
पंचभूताना देवता मानतो
पर्यावरणाचे स्मरण करतो

पंचप्राणालाच देव मानणारा आहे मी-!
निसर्गात देवत्व जाणणारा
आस्तिक आहे मी -!

अंधश्रद्धेला थारा नाही श्रद्धाच जपतो मी

जादूटोणा, चमत्कार, बुवाबाजीला फटकारतो मी
दगडाच्या देवापुढे झुकणारा आस्तिक आहे मी-!
तो दगडाचा देव वसतो--नदीकिनारी -!
--सागरतिरी-!
--गिरी पर्वतावरी-!
--अथवा खोल दरी-!

अशा स्थळी भेट देणारा निसर्ग प्रेमी आहे मी -!
दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी-!

निंरतर अंधश्रद्धा हा शब्द केवळ धार्मिक बाबतीत च लावला.हे त्यांचे स्वार्थ म्हणावा का अज्ञान. कोणीही उठायाच आणि आध्यात्मिक धार्मिक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणावे.हे सर्व काय आपल्या भारतीय संतापेक्षा ग्रेट आहेत का ?नाही मुळीच नाही.

पण आज खरी अंधश्रद्धा स्वतः ला विज्ञानवादी म्हणून घेणारे लोकच अंधश्रद्धेला बळी पडले.ते कसे ते ही सांगणार.

विज्ञानाचा आधार घ्यावा पण अध्यात्म ला नाव ठेऊन नव्हे.उलट विज्ञान अध्यात्मचा बोट धरून चालले आहे. यात शंकाच नाही.आज बरेच लोक या अंधश्रद्धेला बळी पडले आहे.

प्रथम् श्रद्धा म्हणजे काय?
:श्रद्धा म्हणेचच विश्वास ✔
T.V वर दाखवलेले जाणा-या जाहिराती ही खरी अंधश्रद्धा पसरवतात आणि याला बळी पडतात स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे,

ते कसे तर ,👇🏻
फेयर लवली लावल्यावर् माणुस गोरा होतो म्हणे आणि याचा वापर विज्ञानवादी लोक आवडीने करतात. अश्या क्रीम लावून जर माणुस गोरा झाला असता तर जगात कोण काळा राहिला च नसता ना?
आता बघा या लोकांनी त्या क्रीम वर् आपली श्रद्धा (विश्वास)ठेवला आणि या असल्या भोंदू क्रीम वर हे विज्ञानवादी लोक बळी पडतात .

आता सांगा ही अंधश्रद्धा नव्हे का?अजुन बोर्नव्हीटा,हॉर्लिक्स,कोम्पलान ई.हे पावडर दुधात टाकल्याने म्हणे पोर हुशार होतात .पोरांची बुद्धि तेज होती म्हणे? आता मला सांगा मग आपल्या भारतीय महात्म्यांनी कोणता बोर्नव्हीटा पिला होता. उलट भारतीय महात्म्यांना नीट पोटभर अन्न हि मिळाले नाही तरि त्यांची बुद्धि तेज होती.

मग ही अंधश्रद्धा नव्हे का?
मके सेंट मारल्याने स्त्रियां मागे लागतात. ही तर पक्की अंधश्रद्धाच आहे आणि याचा वापर जास्त विज्ञानवादी लोकच करतात.

अजुन एक जाहिरात आहे.आपण पाहिली असेल या नसेल ती जाहिरात अशी की,एक माणसाला पहाडावरुन उडी मरायची होती त्याला भीति वाटत होती आणि त्याला एक साबण सापड़तो आणि तो साबण हा माणुस अंगाला चोळतो आणि त्याला जोश येतो आणि तो त्या पहाड़ीवरुन उडी मारतो.आता हा तर खरा अंधश्रद्धेचा कळसच झाला.

एवढ्या सगळ्या अंधश्रद्धा ते त्याला मान्य करतात त्या साठी ढिगाने पैसे घालतात आणि आमच्या साधू -संतानी आखुन दिलेल्या मार्गाला अंधश्रद्धा म्हणतात.

अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनि ज़रा अंधश्रद्धा कोण करते या कड़े लक्ष् द्यावे उगाच धार्मिक बाबीला लेबल लावू नए. आधी तुमची अंधश्रद्धा दूर करा नंतर समाजाची.