जर जंगलाचा विचार केला तर...
1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?
उत्तर - *हत्ती*
2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?
उत्तर - *जिराफ*
3) कोणता प्राणी सगळ्यात चलाख आहे?
उत्तर - *कोल्हा*
4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?
उत्तर - *चित्ता*
असं असलं तरी *सिंह जंगलाचा राजा आहे.* वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं?
*सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो.*
आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही.
मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.