बोधकथा


*बोधकथा*
*थंडीचे दिवस होते. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो.*
*सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते.*
*इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,*
*"माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे.*
*मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये.*
*ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन,*
*मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे.*
*आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये."*
***
*जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो.*
*राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो.*
*दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !!*
*राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे ? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत."*
*तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे."*
*आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही.*
*शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तो ही हरतो.* *मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके*
*धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो,*
*"हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या.*
*जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय"*
***
*राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो.*
*दोन्ही वस्तूवरून हात फिरवते.*
*आणि*
*_एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे"_*
***
*सगळेच चकित होतात.* *विशेषतः तो माणूस देखील चकित होतो.*
*कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ?*
*पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस* *या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?*
*यावर हसून अंध म्हणतो,* *_"सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम !_*
*_जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता !_*
*_कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही"_*
***
*टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!*
****
*: जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा*
*आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !!*
त्याच्याशी मैत्री वाढवावी.....
अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!