अॅनिमिया म्हणजे काय?

अॅनिमिया म्हणजे काय?

रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहाची गरज असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीन लाल रक्तकणात असते. यांचे कार्य छातीतून शरीराच्या विविध भागात प्राणवायु पोहोचविणे हे आहे. प्राणवायुमुळे शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाते.

अॅनिमियाची कारणे

  • लोहयुक्त आहाराची कमतरता
  • सकस आहाराची कमतरता
  • मानसिक तणाव
  • मासीक पाळीतील रक्तस्राव
  • जास्तीची बाळंतपणे (२ पेक्षा जास्त )
  • वारंवार गर्भपात
  • मलेरिया
  • जंत
  • मुळव्याध

अनिमिया आजाराचे चिन्ह/ लक्षणे

  • आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग फिका पडतो.
  • नखे, डोळे, जीभ फिके दिसायला लागतात.
  • चक्कर येणे
  • भूक मंद होणे
  • चालताना दम लागणे
  • थोडे श्रम केले तरी थकवा जाणवणे
  • निरुत्साह वाढतो
  • चिडचिडेपणा वाढतो.

लोहाच्या कमतरतेमुळे महिला व बालकांमधील काही दुष्परिणाम

अ) महिलांमध्ये रक्ताची कमी असल्यास होणारे दुष्परिणाम

  • कमी वजनाचे बालक जन्माला येते.
  • वेळेच्या अगोदर बाळंत होणे.
  • गरोदरपणात रक्तस्राव होणे.
  • बाळंतपणानंतर जास्त रक्तस्राव होणे
  • बाळंतपणातच महिलेचा मृत्यू होणे
  • जन्माच्या अगोदरच बाळाचा मृत्यू होणे.
  • किशोरींमध्ये पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.

ब) बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम

  • बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे सारखे आजारी पडतात.
  • कुठल्याही कामात लक्ष न देणे. त्यामुळे अशा प्रकारची मुले खेळात, अभ्यासात, इतर बालकांपेक्षा मागे राहतात.
  • आत्मविश्वास कमी होणे.
  • बाळ चिडचिडे होते. सतत रडते