आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट हवंच

एक तरुण मुलाखतीसाठी गेला होता . मुलाखत सुरु झाली . कंपनीचा एमडी ती मुलाखत घेत होता . मुलाखत चांगली झाली . शेवटचा प्रश्न म्हणून एमडीनं त्या तरुणाला विचारलं की तुझं या कंपनीत येण्याचं उद्दिष्ट काय ? तो म्हणाला , मला तुमच्या खुर्चीवर बसायचं आहे . एमडी म्हणाला की , अरे तू जर माझ्या खुर्चीत बसलास तर मी कुठे जाऊ . त्या तरुणानं या उत्तरावरच प्रतिप्रश्न केला की , तुमचं काहीच उद्दिष्ट नाही का ?, आयुष्यभर इथेच एमडी म्हणून राहणार का?
    मुलाखत घेणारा अवाक होऊन पहातच राहिला . हा किस्सा सांगण्याचा उद्देश इतकाच की आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट हवंच आणि तसं ते नसेल तर आजच निश्चितही करायला हवं . त्यासाठी आपले विचार बदलायला हवेत, तरच आयुष्य बदलेल !