उत्तम आरोग्याची काही रहस्ये !

१) चांगल्या आरोग्याकरिता रात्री लवकर झोपणे आणि सकाळी उठणे आवश्यक असते.
२) सकाळी उठल्यानंतर  तोंड धुण्याअगोदर  ३-४ ग्लास सर्वसामान्य थंड पाणी प्यावे. पाणी पिल्यानंतर व्यायाम करावा किंवा शुद्ध हवेत फिरण्यासाठी जावे .
३)चागंल्या आरोग्याकरिता दररोज सकाळी स्नान करणे आवश्यक असते. उन्हाळ्यामध्ये सकाळ संध्याकाळ गार पाण्याने स्नान करावे. उन्हाळ्यात थंड   पाण्याने तर हिव्हाळ्यात कोमट पाण्याने स्नान करावे. जास्त कडक पाण्याने स्नान केल्यामुळे आपली त्वचा कमकुवत बनते. त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचा रोग  होण्याची शक्यता वाढते .
४) स्नान केल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. त्यामुळे मन प्रसन्न राहते आणि त्वचा रोगापासून बचाव होतो.
 ५)स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून काही वेळ ईश्वराच्या वंदनेत आपले ध्यान लावावे. त्यामुळे मानसिक शांती लाभते, सोबतच दिवसभर चांगली  कामे करण्यास आत्मबळ मिळते.
६)नेहमी संतुलित आणि साधारण भोजन घ्यावे. जेवणात दुध, दही, व मोसमी फळे घ्यावीत. आहारात भाज्यांची मात्रा जास्त आणि अन्नांची मात्रा कमी असणे लाभदायक असते.
मीठ, साखर, तूप-तेल किंवा तळलेल्या पदार्थाचे प्रमाण नगण्य ठेवल्यास हाय ब्लड प्रेशर , डायबेटीज किंवा हृदय विकाराची समस्या यासारख्या आजारापासून बचाव होतो.
७) भोजन नेहमी प्रसन्नमनाने चावून -चावून हळूहळू  करणे गरजेचे असते. जेवण करताना आपले लक्ष्य टीव्हीकडे असू नये, तर आपल्या जेवणाकडेच पूर्ण लक्ष्य द्यावे.  त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात जेवण करणार नाहीत, तसेच जेवणामुळे तुम्हाला पूर्ण तृप्ती मिळेल.
८) जेवेन नेहमी भूक लागल्यानंतरच करावे. भूक न लागता केलेल्या जेवणामुळे अनेक समस्यांना निमंत्रण दिले जाते.
९)जेवण नेहमी आवश्यक असेल तेवढेच घ्यावे. बळजबरी भरपोट जेवल्यामुळेदेखील  अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
१०)औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. स्वत:च आपल्या मनाने औषधांचे सेवन करण्यामुळे घटक परिणाम होण्याची शक्यता असते. काही औषधांचे दुष्परिणाम इतर दुसरयाच आजारामधून समोर येत असतात.
११)व्यसनापासून दुसर राहावे. व्यसनामुळे शरीराचा नाश होतो. धन, बल आणि प्रतिष्टेचा व्यसनामुळे ऱ्हास होतो.
१२)स्वत:ला नेहमी चिंतामुक्त ठेवावे. कारण चिंतामुक्त मनुष्य हा निरोगी असतो.
१३)स्वत:ला नेहमी आनंदी ठेवावे.