जिवंतापेक्षा दगडावरच जास्त प्रेम.

*उंदीर जर दगडाचा असला तर देवाच्या पाया जवळ ठेवून सगळे त्याची पूजा करतात.*
*पण तोच जीवंत उंदिर समोर आला तर त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही.*
*साप जर दगडाचा असेल तर त्याची देवाच्या डोक्यावर बसवून पुजा करतात. दुधाचा अभिषेक करतात.*
*पण जीवंत साप समोर आल्याबरोबर तडकाफडकी त्याला ठेचून मारले जाते.*
*स्त्री जर दगडाची असेल तर आई स्वरूप मानून तिचे कडक उपवासाने पूजन केले जाते.*
*पण जीवंत स्त्री समोर आल्यावर तीचा विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी नाना प्रकारे बळी घेतला जातो.*
*जीवंतपणाचा इतका तिरस्कार का केला जातो.*
*धर्म सांगतो का?जिवंतापेक्षा दगडावरच जास्त प्रेम करा.*
*त्यामुळंच की काय आता लोकांची मनंही दगडासारखी होत चालली आहेत.*